Manasvi Choudhary
पावसाळ्यात अळूच्या भाजीला मागणी असते. अळूच्या पानांची भाजी, अळूवडी तुम्ही खाल्लीच असेल. पण अळूचं शेंगदाणा टाकून फतफतं बनवल्यास आणखी चव वाढते.
अळूचं फतफतं बनवण्याची रेसिपी सोपी आहे. तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने अळूचं फतफतं ही रेसिपी बनवू शकता.
भाजी बनवण्यासाठी अळुची पाने, चणाडाळ, शेंगदाणे, मसाला, हळद, गूळ,चिंच, हिरवी मिरची, जिरे, हिंग, कढीपत्ता, मीठ, तेल साहित्य घ्या.
सर्वातआधी भाजी बनवण्यापूर्वी एका बाऊलमध्ये ३ ते ४ तास आधी चण्याची डाळ आणि शेंगदाणे भिजत घाला.
त्यानंतर अळूची पाने स्वच्छ धुवून घ्या. भाजीची देठ नीट सोलून घ्या. गॅसवर कुकरमध्ये अळुची चिरलेली भाजी, चणाडाळ आणि शेंगदाणे एकत्र शिजवून घ्या.
गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये मोहरी, लसूण चांगला परतून घ्या. नंतर त्यात जिरे, मिरची आणि कढीपत्ता मिक्स करा.
मिश्रणात हिंग आणि शिजवलेली अळुभाजी, शेंगदाणे मिक्स करा. या भाजीमध्ये चिंच मिक्स करा आणि भाजी शिजवून घ्या. अशाप्रकारे घरच्या घरी अळुचं फतफतं पातळ भाजी रेसिपी तयार होईल.