Kidney Damage : सकाळी उठताच शरीरात जाणवणारे 'हे' ५ बदल, किडनी खराब होण्याचे असू शकते लक्षण

Shreya Maskar

चेहऱ्यावर- डोळ्यांखाली सूज

तुम्हाला सकाळी उठल्यावर डोळ्यांखाली, चेहऱ्यावर सूज दिसली, तर हे किडनीच्या कार्यात बिघाड झाल्याचे लक्षण असू शकते. किडनी शरीरातील अतिरिक्त पाणी आणि क्षार योग्यरित्या काढून टाकू शकत नाहीत, ज्यामुळे शरीरात पाणी साठून राहते.

Swelling on eyes | pinterest

लघवी

तुम्हाला किडनीचा त्रास असेल, तर लघवी करण्याच्या सवयींमध्ये बदल जाणवतात. वारंवार लघवी होणे, रात्री जास्त लघवी होणे, लघवीला फेस येणे किंवा लघवीच्या रंगात बदल होणे याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

Urination | pinterest

पाय- घोट्यांना सूज

किडनी निकामी झाल्यामुळे शरीरात अतिरिक्त द्रव साठू शकतो, ज्यामुळे पाय, घोटे आणि हातांना सूज येते. सकाळी उठल्यावर पाय सूजतात.

Swelling in the legs | pinterest

थकवा- अशक्तपणा

किडनीच्या अशक्तपणामुळे शरीरात विषारी द्रव्ये साठू शकतात, ज्यामुळे थकवा, अशक्तपणा आणि ऊर्जेची कमतरता जाणवू शकते. सकाळी उठल्यानंतरही शरीर जड वाटते.

weakness | pinterest

त्वचेचे आरोग्य बिघडते

मूत्रपिंडाच्या कार्यात बिघाड झाल्यामुळे शरीरातील टाकाऊ पदार्थांचे प्रमाण वाढू शकते. यामुळे त्वचेला खाज सुटणे, कोरडेपणा आणि जळजळ यांसारख्या त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.

skin health | pinterest

मळमळणे

शरीरात साचलेल्या टाकाऊ पदार्थांमुळे पोटाच्या तक्रारी उद्भवू शकतात आणि सकाळी उठल्यावर मळमळणे किंवा भूक न लागणे यांसारखे त्रास होऊ शकतात.

Nausea | pinterest

तोंडात दुर्गंधी

टाकाऊ पदार्थांच्या साचण्यामुळे (युरिमिया) सकाळी उठल्यावर तोंडाला दुर्गंधी येऊ शकते किंवा तोंडात धातूसारखी विचित्र चव जाणवू शकते.

Bad Breath | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : किडनी खराब होण्यापूर्वी शरीर देते 'हे' संकेत, महिलांनो! दुर्लक्ष करणे पडेल महागात

Kidney Damage | AI PHOTO
येथे क्लिक करा...