Shreya Maskar
आजकाल आपण छोट्या छोट्या आरोग्याच्या समस्यांसाठी पेनकिलर खातो. पावसाळ्यात सर्दी, ताप , खोकला आला की पेनकिलर घेतो. तसेच कामामुळे अंगदुखी वाढली की पेनकिलर खातो.
वारंवार, जास्त प्रमाणात पेनकिलर खाल्ल्याने मूत्रपिंडांना होणारा रक्तपुरवठा कमी होतो, ज्यामुळे त्यांच्या गाळणीवर ताण येऊ शकतो. किडनी खराब होण्याचा धोका वाढतो. योग्य रक्तपुरवठ्याच्या या अभावामुळे टाकाऊ पदार्थ गाळणे कठीण होते.
कमी झालेल्या रक्तप्रवाहामुळे किडनीला तीव्र इजा होऊ शकते. म्हणजेच मूत्रपिंडे एकदम नीट काम करणे थांबवतात.
पेनकिलर मूत्रपिंडाच्या ऊतींवर व्रण निर्माण करतात आणि त्यामुळे क्रॉनिक किडनी डिसीज (CKD) होतो. पेनकिलर ओवरडोज यकृतावर ताण येऊ शकतो.
वेदनाशामक औषधांमुळे शरीरात मीठ आणि पाणी साठून राहू शकते, ज्यामुळे रक्तदाब वाढतो आणि कालांतराने मूत्रपिंडांना इजा पोहोचते.
लघवी कमी होणे, पाय किंवा चेहऱ्यावर सूज येणे, सतत थकवा जाणवणे किंवा मळमळ होणे या लक्षणांवर लक्ष ठेवा.
ज्या लोकांना आधीपासून मूत्रपिंडाचा आजार, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग डिहायड्रेशन यांची समस्या आहे. त्यांनी पेनकिलर खाणे टाळा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.