Manasvi Choudhary
किडनी हा शरीराचा महत्त्वाचा अवयव आहे, जो शरीरातील रक्त गाळण्याचे आणि विषारी घटक बाहेर टाकण्याचे कार्य करते.
मात्र, जेव्हा किडनीचे कार्य बिघडू लागते तेव्हा शरीर काही गंभीर संकेत देते जी तुमच्या चेहऱ्यावर देखील दिसतात ही लक्षणे कोणती ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
शरीरात साचलेल्या अतिरिक्त मीठाचे आणि द्रव्यांचे प्रमाण वाढल्यामुळे किडनी ते गाळू शकत नाही, परिणामी चेहरा आणि गालांवर सूज येऊ लागते.
सकाळी झोपून उठल्यावर डोळ्यांच्या आसपास किंवा पापण्यांवर सतत सूज दिसत असेल, तर ते किडनी खराब होण्याचे लक्षण असते.
रक्तातील टाकाऊ घटक वाढल्यामुळे आणि रक्ताची कमतरता निर्माण झाल्यामुळे चेहऱ्याची त्वचा निस्तेज होऊन तिच्या रंगात बदल होतो.
किडनी शरीरातील खनिजांचे आणि पाण्याचे संतुलन बिघडवते, ज्यामुळे चेहऱ्याची त्वचा कोरडी पडते.
रक्तातील फॉस्फरसचे प्रमाण वाढल्यामुळे चेहऱ्यावर आणि संपूर्ण त्वचेवर सतत खाज येते आणि जळजळ होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.