Nagpur Tourism : पाण्याने वेढलेले 'हे' ठिकाण जगात भारी, बोटिंगचा घ्या अनोखा अनुभव

Shreya Maskar

नागपूर

महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील रामटेकजवळ वसलेला खिंडसी तलाव हे एक निसर्गरम्य आणि मोठे पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण नागपूरपासून जवळ आहे.

Lake | google

वैशिष्ट्ये

खिंडसी तलाव घनदाट जंगलाने वेढलेले आहे. तलाव पर्यटकांसाठी नौकाविहार, जलक्रीडा आणि पिकनिकसाठी उत्तम ठिकाण आहे.

Lake | google

कृत्रिम तलाव

खिंडसी तलाव हे निसर्गरम्य आणि मोठे कृत्रिम तलाव आहे. येथे तुम्ही फोटोशूट करू शकता. थंडीत येथे सुंदर वातावरण अनुभवता येते.

Lake | google

नौकाविहार

खिंडसी तलाव हा मध्य भारतातील एक प्रमुख व सर्वात मोठे नौकाविहार केंद्र आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.

Lake | google

पिकनिक स्पॉट

वीकेंडला भेट देण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथील निसर्ग खुलून येतो. लहान मुलांना तुफान मजा-मस्ती करता येईल.

Lake | google

कोणी बांधला?

खिंडसी तलाव नागपूरचे राजे मुधोजी द्वितीय भोंसले यांनी १८४० मध्ये बांधला. जो खिंडसी नदीवर धरण बांधून तयार करण्यात आला होता.

Lake | google

पर्यटन स्थळे

खिंडसी तलावाच्या सान्निध्यात ऐतिहासिक राम मंदिर आणि प्राचीन कारपूर बाओली अत्यंत प्रसिद्ध आहेत. त्यामुळे येथे आवर्जून भेट द्या.

Lake | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Lake | google

NEXT : बोटीतून करा इतिहासाची सफर, १६व्या शतकातील 'हा' किल्ला पाहा

Ratnagiri Tourism | yandex
येथे क्लिक करा...