Khekda Bhaji Recipe : गरमागरम चहा अन् कुरकुरीत खेकडा भजी, मुसळधार पावसात करा चटपटीत नाश्ता

Shreya Maskar

कोकण रेसिपी

रिमझिम पावसात कुरकुरीत खेकडा भजी बनवा. कांदा भाजीला कोकणात खेकडा भजी म्हणतात. यात कांदा खेकड्याच्या आकारासारखा लांब कापला जातो.

Konkan recipe | pinterest

खेकडा भजी

खेकडा भजी बनवण्यासाठी तांदळाचे पीठ किंवा मुगाचे पीठ, आले-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, हळद, लाल तिखट, मीठ, कोथिंबीर, तेल इत्यादी साहित्य लागते.

khekada kanda bhaji | pinterest

कांदा

खेकडा भजी बनवण्यासाठी सर्वप्रथम कांदे लांब, अगदी पातळ कापून घ्या. त्यानंतर कांदा हाताने चांगला कुस्करून घ्या, जेणेकरून कांद्यातील पाणी सुटेल.

Onion | pinterest

आले-लसूण पेस्ट

एका बाऊलमध्ये मीठ, हळद, लाल तिखट, आले-लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरच्या घालून मिक्स करा. यात चिरलेला कांदाही टाका.

Ginger-garlic paste | pinterest

तांदळाचे पीठ

तयार कांद्याच्या मिश्रणात तांदळाचे पीठ किंवा मुगाचे पीठ मिक्स करा. कांद्याच्या ओलाव्याने पीठ चांगले मळून घ्या. यात काही थेंब पाण्याचे मिक्स करा. वरून कोथिंबीर घाला.

Rice flour | pinterest

तेल

आता भजी खेकड्यांच्या आकारात करून घ्या. दुसरीकडे तेल तापायला गॅसवर ठेवा. पण लक्षात घ्या, कमी आचेवर गॅस ठेवा.

Oil | pinterest

चहा अन् खेकडा भजी

तेलात खेकडा भजी गोल्डन फ्राय करा आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. पावसाळ्यात गरमागरम चहा किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत खेकडा भजीचा आस्वाद घ्या.

Tea and bhaji | pinterest

टीप

तुम्ही यात थोडे बेसन देखील टाकू शकता. तसेच यात ओवा टाकल्यास तुम्हाला ॲसिडीटीचा त्रास होणार नाही.

Note | pinterest

NEXT :  गरमागरम चहा अन् मऊ, जाळीदार घावणे, पावसाळ्यात बनवा अस्सल कोकणी नाश्ता

Konkan-Ghavan Recipe | saam tv
येथे क्लिक करा...