Shruti Vilas Kadam
शेव – १ कप, दूध – १ लिटर, साखर – ½ कप (चवीनुसार), तूप – १ चमचा, सुका मेवा (बदाम, काजू, मनुका), वेलदोडा पूड – ½ टीस्पून.
प्रथम कढईत तूप गरम करून त्यात शेव हलकी सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. सतत ढवळत राहा म्हणजे शेव करपणार नाही.
दुसऱ्या पातेल्यात दूध उकळायला ठेवा. दूध एकदा उकळले की त्यात भाजलेली शेव घाला.
मध्यम आचेवर १०-१५ मिनिटे शेव चांगली शिजेपर्यंत ढवळत राहा. खीर थोडी गडद होऊ लागेल.
नंतर त्यात साखर घाला आणि पुन्हा ५ मिनिटे उकळा. साखर पूर्ण विरघळेपर्यंत हलवत राहा.
शेवटी त्यात तळलेला सुका मेवा आणि वेलदोड्याची पूड घालून एक उकळी आणा.
खीर गरम किंवा थंड दोन्ही प्रकारे सर्व्ह करता येते. थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवल्यास चव अधिक खुलते.