Khatu Shyam: आधी साईबाबा आता खाटू श्याम, शहरांमध्ये नव्या श्रद्धेची लाट

Bharat Jadhav

बदलता श्रद्धेचा कल

शहरांमधील श्रद्धेचा कल कधीच सारखा राहत नाही. ज्याप्रमाणे फॅशन आणि जीवनशैलीचे ट्रेंड वेळोवेळी बदलत राहतात. त्याचप्रमाणे भक्तीची केंद्रे देखील वेळोवेळी बदलत राहतात.

Khatu Shyam Mandir

आधी साई, नंतर शनिदेव आता खाटू श्याम

आधी शहराशहरांमध्ये साईबाबांची मंदिरे उभारली जात. त्यानंतर देशातील अनेक शहरांमध्ये शनिदेवाच्या भक्तीची लाट उसळली. त्यावेळी प्रत्येक भागात एक नवीन शनि मंदिर उभे राहिले. आता गेल्या अनेक वर्षांपासून, खाटूश्याम बाबांची लाट उसळलीय.

Khatu Shyam

शहरांमध्ये नवा ट्रेंड

भोपाळसारखी शहरे याचे उदाहरण आहेत. येथे एक लहान मंदिरापासून सुरू झालेली भक्तीची लाट आता अनेक प्रमुख केंद्रांमध्ये पसरलीय. बदल केवळ एका शहरापुरता मर्यादित नाही तर देशभरात दिसतोय. महाराष्ट्रातील खान्देशात सुद्धा श्रद्धेचा ट्रेंड बदललाय.

Khatu Shyam Dham

तरुण भारताचे दैवत खाटू श्याम

एका मीडिया रिपोर्टनुसार, खाटू श्याम मंदिर तरुण भारताचे नवे दैवत म्हणून उदयास आलंय. त्यात सोशल मीडियाने त्यांची लोकप्रियता घराघरात पोहोचवण्यास मदत केली. एका वृत्तानुसार उत्तर प्रदेशातील बरेली येथेच चार खाटू श्याम मंदिरे बांधण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील मालेगावातही खाटू श्याम महाराज यांचे मंदिर बांधण्यात आलंय.

Khatu Shyam Mandir Rajsthan

लोकप्रियता झपाट्याने वाढली

गेल्या काही वर्षांत खाटू श्यामची लोकप्रियता झपाट्याने वाढलीय. एका अहवालानुसार, २०२३ ते २०२४ दरम्यान राजस्थानमधील खाटू श्याम धामला भेट देणाऱ्या भाविकांची संख्या लाखोंवर पोहोचली. २०२४ मध्ये हा आकडा २३.६ दशलक्ष झाला.

khatu syam sikar

शहरांमध्ये श्रद्धेचा ट्रेंड बदलला

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील बरखेडी येथे १०० वर्षांपूर्वी शनिदेवाची पहिली मूर्ती स्थापित करण्यात आली होती. मग दोन दशकांनंतर, शनि मंदिरे बांधण्याची प्रक्रिया इतकी सुरू झाली की त्यांची संख्या ५० पर्यंत पोहोचलीय.

साईमंदिर

त्याचप्रमाणे, शहरातील पहिले साई मंदिर १९८५ ते १९८७ दरम्यान बांधले गेले. शहराच्या विविध भागात साई मंदिरांची संख्या ४० पर्यंत वाढली. आता गेल्या ३ वर्षांपासून श्रद्धेची लाट खाटू श्यामकडे वळलीय.

Sai baba mandir shirdi

पहिलं खाटू श्याम बाबाचं मंदिर कोलारमध्ये

खाटू श्यामला समर्पित असलेलं एक लहान मंदिर २००२ मध्ये कोलार येथील प्राचीन हनुमान मंदिर बांधण्यात आलं त्याच कोलारमध्ये २००२ च्या काळात खाटू श्याम बाबाचे मंदिर बांधण्यात आले. तीन वर्षांपूर्वी हे शहरातील एकमेव खाटू श्याम मंदिर होते. आता ते शहरातील सर्वात मोठे खाटू श्याम मंदिर बनले आहे.

हेही वाचा

येथे क्लिक करा

Prime Minister Secretary Job Eligibility
PMचा PA बनायचंय? कशी होते पर्सनल सेक्रेटरीची निवड, किती असतो पगार?