Kharvas Recipe: घरच्या घरी मऊसूत आणि चविष्ट खरवस कसा करायचा, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

खरवस म्हणजे काय?

खरवस हा गायीच्या किंवा म्हशीच्या पहिल्या दुधापासून (चिक) बनवला जाणारा पारंपरिक गोड पदार्थ आहे. तो पौष्टिक आणि पचायला हलका असतो.

kharvas recipe | Saam tv

आवश्यक साहित्य

चिक दूध (पहिलं दूध), साधं दूध, गूळ किंवा साखर, वेलची पूड, केशर (ऐच्छिक).

Kharvas Recipe | Saam Tv

दूध योग्य प्रमाणात मिसळा

चिक दूध जाड असल्यामुळे त्यात थोडं साधं दूध मिसळावं. दूध फार पातळ किंवा फार घट्ट होणार नाही याची काळजी घ्या.

Kharvas Recipe | yandex

गोडपणा आणि स्वाद वाढवा

मिश्रणात चवीनुसार गूळ किंवा साखर घाला. गूळ वापरल्यास खरवसाला नैसर्गिक रंग आणि चव मिळते. शेवटी वेलची पूड आणि केशर घाला.

Kharvas Recipe | Saam TV

मिश्रण नीट गाळा

खरवस शिजवण्याआधी मिश्रण गाळून घ्या. त्यामुळे खरवस एकसारखा, मऊ आणि गुठळ्याविना तयार होतो.

Kharvas Recipe | Instagram

वाफवून खरवस शिजवा

मिश्रण भांड्यात ओता आणि मध्यम आचेवर वाफ द्या. साधारण ३०–४० मिनिटांत खरवस छान सेट होतो. कुकरमध्ये शिजवताना शिटी न लावता वाफ द्या.

Kharvas Recipe | Social Media

थंड झाल्यावर सर्व्ह करा

खरवस पूर्ण थंड झाल्यावर तुकडे करा आणि सर्व्ह करा. हा पदार्थ थंड किंवा नॉर्मल तापमानात अधिक चविष्ट लागतो.

kharvas recipe | Saam TV

Lipstick Shades: तुम्हीपण नेहमीच चुकीच्या रंगाची लिपस्टिक खरेदी करता? मग हा सोपा कोरियन ट्रेंड नक्की वापरून पाहा

lipstick
येथे क्लिक करा