Siddhi Hande
हिवाळा सुरु झाला आहे. थंडीच्या दिवसात पौष्टिक पदार्थ खायचे असतात.
थंडीच्या दिवसात पौष्टिक लाडू, पालेभाज्या, कडधान्ये खायचे असते. या दिवसात मेथीचे, डिंकाचे लाडू बनवले जातात. परंतु तुम्ही खारीक खोबऱ्याचा लाडू कधी खाललाय का?
खारीक खोबऱ्याचा लाडू आजिबात कडू लागत नाही. या लाडूत अनेक पौष्टिक पदार्थ असतात.
खारीक, सुके खोबरे (किसलेले), गूळ, तूप, काजू बदाम, डिंक, मेथी, पीठ
सर्वात आधी खारीकमधील बिया काढून घ्या. खारी बारीक करा. खोबरेदेखील किसून घ्या.
यानंतर तुम्ही विविध पीठ म्हणजे उडीद, चनाडाळ, मूगडाळीचे पीठदेखील भाजून घ्या.
यानंतर सुका मेवा, मेथी भाजून घ्या. याचसोबत खारीक आणि खोबरेदेखील भाजून घ्या.
एका बाजूला डिंकदेखील तळून घ्या. यानंतर हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करा.
सर्व पीठे, सुका मेवा, मेथी सर्व गोष्टी बारीक करुन एका ताटात काढा.
एका बाजूला गुळाचा पाक तयार करायला ठेवा. हा पाक या मिश्रणात टाका.
यानंतर या मिश्रणाचे लाडू वळून घ्या. हे लाडू खूपच टेस्टी असतात.