Shreya Maskar
दिवाळीच्या फराळात गोड पदार्थांसोबत खमंग, कुरकुरीत आणि चटपटीत नमकीन / खारी शंकरपाळी असली की, फराळाची रंगत आणखी वाढते. मैदा, रवा आणि काही मसाल्यांचा वापर करून ही शंकरपाळी घरी सहज बनवता येते.
खारी शंकरपाळी बनवण्यासाठी मैदा, रवा, तेल, तूप, ओवा, जिरे, लाल तिखट, हळद, मीठ, पाणी इत्यादी साहित्य लागते.
खारी शंकरपाळी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका परातीत मैदा, रवा, ओवा, जिरे, लाल तिखट, हळद आणि मीठ घालून सर्व साहित्य एकत्र मिक्स करा.
मिश्रणात गरम तेल किंवा तूप घालून हाताने चांगले एकत्र करा. मिश्रण हातात दाबल्यावर त्याचा गोळा तयार झाला, तर मोहन योग्य प्रमाणात घातले आहे.
थोडेथोडे पाणी घालून घट्ट पीठ मळा. पीठ झाकून १५ ते २० मिनिटे बाजूला ठेवा. पिठाचा एक गोळा घेऊन पोळपाटावर जाडसर लाटून घ्या. सुरी किंवा कातण्याने चौकोनी, हिऱ्याच्या आकाराचे किंवा लांबट तुकडे कापा.
पॅनमध्ये तेल गरम करून शंकरपाळी गोल्डन फ्राय करा. शंकरपाळी कुरकुरीत होईपर्यंत तळा. एकसारखे तळण्यासाठी अधूनमधून हलके हलवा.
तळलेली शंकरपाळी टिश्यू पेपरवर काढून त्यातील अतिरिक्त तेल काढून टाका. शंकरपाळी पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा.
पीठ नेहमी घट्ट मळा. सैल पीठामुळे शंकरपाळी तेलकट होऊ शकते. मोहनासाठी गरम तेल किंवा तूप वापरा, त्यामुळे शंकरपाळी खुसखुशीत होते.पिठात थोडे तीळ किंवा चिमूटभर हिंग घातल्यास चव आणखी छान लागते.