Manasvi Choudhary
एप्रिल, मे उन्हाळ्याचा सीझन सुरू आहे. बाजारात आंबा विक्रीला सुरूवात झाली आहे. बाजारात हापूस आंब्याचे अनेक प्रकार असतात.
त्यापैकी देवगड, रत्नागिरी आणि कर्नाटकचा हापूस आंबा कसा ओळखायचा? याच्या काही सोप्या टिप्स जाणून घेऊया.
बाजारात इतर आंब्यांच्या तुलनेत रत्नागिरी, देवगड आणि कर्नाटकचे हापूस आंबे फारच प्रसिद्ध आहेत. मात्र ते खरेदी करताना ओळख पडणे अवघड असते.
रत्नागिरी, देवगड आणि कर्नाटकचे हापूस आंबे हे आंब्यांची चव, सुंगध आणि आकारावरून ओळखता येतात.
अस्सल देवगड हापूस आंब्यांची साल पातळ असते, तर रत्नागिरी हापूस आंब्याची साल थोडीशी जाड असते. कर्नाटकी हापूस आंबा हा रत्नागिरी हापूसपेक्षा थोडा जास्त पिवळसर असतो.
देवगड आंब्यांची साल ओढल्यास आतील गाभा चिकटत नाही तर रत्नागिरी आंब्याची साल ओढल्यास रस गाभा चिकटून घेतो.
देवगड हापूस आंब्याचा रंग हा केशरी असतो तर रत्नागिरी हापूस आंब्यांचा रंग थोडासा पिवळसर असतो. तसेच कर्नाटकी आंब्यावर पिकण्याआधी हिरवट रंगावर काळसर डाग असतात.
देवगड हापूस आंब्याचा आकार गोलसर असतो तर देवगड हापूस आंब्याचा आकार लांबट असतो. कर्नाटकी आंबा पिकल्यानंतर त्याचा देठाचा भाग खूप आत असतो.