Khanderi Fort : अलिबागच्या समुद्रात दडलेले मराठा वैभव, खांदेरी किल्ल्याला 'खांदेरी' नाव कसं पडलं?

Shreya Maskar

खांदेरी किल्ला

खांदेरी किल्ला अरबी समुद्रातील एका बेटावर वसलेला असून अलिबागजवळील 'थल'च्या किनाऱ्यापासून साधारणपणे ५ किलोमीटर अंतरावर वसलेला आहे. या किल्ल्यावर एक वैशिष्ट्यपूर्ण दीपगृह असून तो आपल्या 'अंदेरी' या जुळ्या किल्ल्याशी अगदी जवळून जोडलेला आहे.

Khanderi Fort | google

जागतिक वारसा स्थळ

खांदेरी किल्ला 'युनेस्को जागतिक वारसा स्थळ' म्हणून मान्यता मिळालेल्या १२ मराठा लष्करी स्थळांपैकी हा एक आहे. अलिबागला गेल्यावर हे ऐतिहासिक ठिकाण पाहायला नक्की जा.

World Heritage Site | google

किल्ला का बांधण्यात आला?

मुरुड-जंजिऱ्याच्या सिद्दींचा मुकाबला करण्यासाठी १६७९ मध्ये बांधलेला हा किल्ला मराठा सागरी लष्करी स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून प्रसिद्ध आहे.

Why Was the Fort Built? | google

जुने नाव

खांदेरी किल्ल्याला 'कान्होजी आंग्रे बेट' म्हणूनही ओळखले जातो. खांदेरी किल्ला हा मराठा साम्राज्याने १७ व्या शतकात उभारलेला एक ऐतिहासिक जलदुर्ग आहे. 'कान्होजी आंग्रे बेट' हे नाव १९९८ मध्ये भारत सरकारने मराठा आरमाराचे महान सेनापती सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या अद्भूत सागरी पराक्रमाचा सन्मान करण्यासाठी दिले.

Former Name | google

खांदेरी किल्ला कोणी बांधला?

खांदेरी किल्ला हा जलदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६७९ मध्ये बांधला. मुरुड-जंजिऱ्याच्या सिद्दींवर आणि इंग्रजांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराजांनी हा किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला होता.

Who Built Khanderi Fort? | google

खांदेरी नाव का पडलं?

असे बोले जाते की, खांदेरी किल्ल्याचे नाव स्थानिक देवता खंडोबा (शिव) यावरून पडले आहे. बेटावरील मुख्य देवस्थान 'खंडोबा' असल्यामुळे या बेटाला आणि किल्ल्याला खांदेरी असे नाव पडले.

How ​​did it get the name 'Khanderi'? | google

किल्ल्यावर कसं जाल?

अलिबाग जवळील थळ गावात पोहचा. तेथून बोटींने ३०-४० मिनिटांचा प्रवास करून खांदेरी किल्ल्यावर पोहचता येते. परदेशी पर्यटकही येथे आवर्जून येतात.

How ​​to reach the fort? | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : शिवकालीन पराक्रमाचा वारसा! गोपाळगड किल्ला पर्यटकांसाठी खुला, अरबी समुद्राचा अद्भुत नजारा पाहून भारावून जाल

Gopalgad Fort | saam tv
येथे क्लिक करा...