ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
खणाला नेहमी पारंपरिक दृष्टिकोनाने पाहिले जाते. परंतु खणाचा ब्लाउज वापरुन तुम्ही मॉर्डन आणि स्टायलिश लूक मिळवू शकता.
या डिझाइनमध्ये तुम्हाला पारंपरिक खणासोबत थोडासा बोल्ड टच मिळेल.
मॉर्डन आणि स्टायलिश लूकसाठी तुम्ही बॅकलेस ब्लाउज विथ डोरी असणारी डिझाइन ट्राय करु शकता.
शर्ट स्टाइल ब्लाउज डिझाइन हे ऑफिस किंवा फॉर्मल साडीसाठी एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला क्लासी लूक मिळेल.
एलिगंट आणि क्लासी लूकसाठी तुम्ही स्लीव्हलेस हाय नेक ब्लाउज डिझाइन शिवू शकता.
जॅकेट स्टाइल ब्लाउज तुम्हाला थंडीच्या दिवसांत सुंदर लूक देण्यासह थंडीपासूनही वाचवेल.
यंग जनरेशनसाठी कोल्ड शोल्डर डिझाइन परफेक्ट आहे. यामध्ये खणाचा पारंपरिक साज आणि मॉर्डन टच फ्यूजनमुळे स्टायलिश आणि युनिक लूक मिळेल.