Siddhi Hande
रोज नाश्त्याला काय बनवायचा असा प्रश्न महिलांना पडलेला असतो. तुम्ही घरच्या घरी खमण ढोकळा बनवू शकतात.
खमण ढोकळा बनवण्यासाठी एका भांड्यात बेसन, हळद, मीठ आणि दही एकत्र मिक्स करायचे आहे.
या मिश्रणात अर्धा कप पाणी टाकून सर्व मिश्रण छान फेटून घ्या. हे मिश्रण १५ मिनिटे बाजूला ठेवा.
यानंतर एका ताटात किंवा कुकरच्या डब्ब्यात हे मिश्रण टाका. यात थोडा सोडा टाका.
यानंतर हे मिश्रण कुकरमध्ये किंवा टोपात शिजवून घ्या. कुकरची शिटी काढून हे मिश्रण १०-१५ मिनिटे शिजवून घ्या.
यानंतर फोडणी तयार करण्यासाठी एका कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी, हिंग आणि हिरवी मिरची टाका.
या फोडणीत थोडी साखर टाका.
यानंतर ढोकळा एका ताटात काढा. त्याचे बारीक तुकडे करा. या ढोकळ्यावर छान फोडणी पसरवून टाका.
हा ढोकळा तुम्ही चटणीसोबत खाऊ शकतात.