Shruti Vilas Kadam
खजूरमध्ये नैसर्गिक ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि सुक्रोज मुबलक असल्यामुळे ते शरीराला लगेच ऊर्जा देते.
खजूरमध्ये फायबर मुबलक असल्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते आणि पचनक्रिया सुधारते.
पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्समुळे खजूर हृदयाचे स्वास्थ्य सुधारते आणि हार्ट-डिसीजचा धोका कमी करते.
खजूरमध्ये आयर्न भरपूर असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते आणि अॅनिमिया कमी होतो.
कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असल्यामुळे खजूर हाडे मजबूत करण्यात मदत करतो.
अँटिऑक्सिडंट्समुळे खजूर शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतो, विशेषतः हिवाळ्यात खूप फायदेशीर.
उच्च कॅलरी आणि नैसर्गिक साखरेमुळे खजूर वजन वाढवू इच्छिणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे.