Shruti Vilas Kadam
हिवाळ्यात दही थंड असल्यामुळे शरीरातील कफ वाढतो आणि सर्दी-खोकला लवकर होऊ शकतो.
दही कफ निर्माण करणारे अन्न मानले जाते. त्यामुळे ज्यांना कफाचा त्रास जास्त होतो त्यांनी हिवाळ्यात दही टाळावे.
थंड दही खाल्ल्याने घसा बसणे, दुखणे किंवा आवाजावर परिणाम होऊ शकतो.
कमी तापमानात दही पचायला वेळ लागतो, त्यामुळे पोट फुगणे, जडपणा किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो.
ज्यांना दमा, सायनुस, धूळ-अॅलर्जी असते त्यांनी दही खाल्ल्यास लक्षणे वाढू शकतात.
हिवाळ्यात रात्री दही खाल्ल्याने कफ, अपचन, घसा बसणे आणि थंडी वाढण्याचे प्रमाण अधिक होते.
थंड प्रकृती असलेल्या लोकांमध्ये दहीमुळे थंडी वाढून सांधेदुखी, थरथर किंवा अंगदुखी वाढू शकते.