Kesar Rasgulla Recipe: घरीच बनवा मऊ, लुसलुशीत केशर रसगुल्ला, तोंडात टाकताच विरघळेल

Siddhi Hande

गोडाचा पदार्थ

जेवल्यानंतर गोड पदार्थ खायला अनेकांना आवडते. तुम्ही घरीच केशर रसगुल्ला बनवू शकतात.

Kesar Rasgulla Recipe

रसगुल्ला

केशर रसगुल्ला बनवण्याची रेसिपी खूप सोपी आहे. हा रसगुल्ला तोंडात टाकताच विरघळेल.

Kesar Rasgulla Recipe

साहित्य

दूध, लिंबाचा रस किंवा व्हिनेगर, साखर, पाणी, केशर, वेलची पूड, केशर हे कोमट दूधात भिजवलेले असायला हवे.

Kesar Rasgulla Recipe

दूध उकळून घ्या

सर्वात आधी दूध गरम करा. दूधाला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा.

Kesar Rasgulla Recipe

सूती कापडातून गाळून घ्या

दूधात लिंबाचा रस टाकून ते फाडून घ्या. यानंतर दूध सूती कापडातून गाळून घ्या. यानंतर हे सारण थंड पाण्याने धुवून घ्या. जेणेकरुन आंबटपणा निघून जाईल.

Kesar Rasgulla Recipe

मळून घ्या

यानंतर कापडातून दूधाचा सर्व चोथा निथळल्यानंतर एका ताटात काढा. हे मिश्रण १० मिनिटे छान मऊ होईपर्यंत मळून घ्या. हे मळताना त्यात केशर टाका.

Kesar Rasgulla Recipe

गोळे बनवून घ्या

यानंतर मिश्रणाचे लहान, गोलाकार गोळे बनवून घ्या. याला कुठेही भेगा नसायला हव्या.

Kesar Rasgulla Recipe

साखरेचा पाक तयार करा

एका बाजूला साखरेचा पाक तयार करण्यासाठी ठेवा. त्यासाठी एका भांड्यात साखर आणि पाणी टाका.

Kesar Rasgulla Recipe

रसगुल्ले शिजवून घ्या

उकळलेल्या पाकात हे गोळे टाका.झाकण ठेवून १०-१५ मिनिटे शिजवून घ्या. यामुळे रसगुल्ले आकाराने मोठे होतील.

Rasgulla Recipe

रसगुल्ला फ्रिजमध्ये ठेवा

यानंतर गॅस बंद करुन त्यात वेलची पूड टाका. हे रसगुल्ले फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा.

Rasgulla Recipe | pinterest

Next: अचानक घरी पाहुणे आले? ब्रेडपासून बनवा 'ही' शाही स्वीट डिश, चव अशी की सगळेच म्हणतील WOW

Shahi Tukda | yandex
येथे क्लिक करा