Shreya Maskar
यंदा माघी गणेश जयंती 22 जानेवारी 2026 ला आली आहे. या दिवशी गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवा. १०-१५ मिनिटांत प्रसाद तयार होईल.
केशर माव्याचे मोदक बनवण्यासाठी मिल्क पावडर, दूध, साखर, केशर, तूप, वेलची पूड इत्यादी साहित्य लागते. तुम्हाला आवडत असेल तर यात तुम्ही ड्रायफ्रूट्स देखील टाकू शकता.
केशर माव्याचे मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये दूध ओता आणि त्यात मिल्क पावडर घालून सतत ढवळत रहा. गॅस मध्यम आचेवर ठेवा.
तयार मिश्रणात तूप, केशर, वेलची पावडर घालून चांगले मिक्स करा. गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्या.
मिश्रण थोडे घट्टसर होत आल्यावर त्यात साखर टाका. साखर त्या मिश्रणात संपूर्ण वितळेपर्यंत ढवळत राहा. जेणेकरून आपले मोदक छान बनतील.
त्यानंतर यात ड्रायफ्रूट्स पावडर टाका आणि चांगली कणीक मळा. जेणेकरून मोदकांचा आकार नीट येईल.
हाताला तूप लावा आणि मोदकाचे थोडे सारण घेऊन मोदक वळा. तुम्हाला हाताने मोदक वळता येत असतील. तर सारण मोदकाच्या साच्यात भरा आणि मोदक काढून घ्या.
हे मोदक हवाबंद डब्यात तुम्ही १-२ दिवस चांगले ठेवू शकता. अगदी हलवाई स्टाइल मोदक घरी झटपट बनतील.