Shruti Vilas Kadam
केराटिन ट्रीटमेंटमध्ये केस सरळ आणि स्मूथ करण्यावर भर असतो, तर हेअर बोटॉक्समध्ये खराब झालेल्या केसांचे पोषण आणि रिपेअरिंग केले जाते.
केराटिनमुळे केस अधिक स्ट्रेट आणि शायनी दिसतात. हेअर बोटॉक्समुळे केस नैसर्गिक पद्धतीने मऊ, हेल्दी आणि फ्रिझ-फ्री दिसतात.
काही केराटिन ट्रीटमेंटमध्ये फॉर्मल्डिहाइडसारखी रसायने असू शकतात. हेअर बोटॉक्समध्ये प्रथिने, व्हिटॅमिन्स आणि नैसर्गिक घटकांचा अधिक वापर केला जातो.
खूप कुरळे किंवा अनियंत्रित केस असल्यास केराटिन फायदेशीर ठरू शकते. कोरडे, डॅमेज किंवा तुटणारे केस असल्यास हेअर बोटॉक्स अधिक उपयुक्त मानले जाते.
केराटिनचा परिणाम साधारण ४ ते ६ महिने टिकू शकतो, तर हेअर बोटॉक्सचा परिणाम २ ते ४ महिने टिकतो.
दोन्ही ट्रीटमेंटनंतर सल्फेट-फ्री शॅम्पू वापरणे आणि जास्त हीट टाळणे आवश्यक असते, अन्यथा परिणाम कमी होऊ शकतो.
अनेकांना वाटते की हेअर बोटॉक्स म्हणजे स्ट्रेटनिंग प्रक्रिया आहे; मात्र हे मुख्यतः केसांना पोषण देऊन त्यांची गुणवत्ता सुधारण्याचे काम करते.