Shreya Maskar
पिठाच्या डब्यात चांदीचे नाणे ठेवल्यामुळे पीठ अनेक दिवस ताजे राहते. चांदीमध्ये नैसर्गिक जीवाणूनाशक आणि बुरशीनाशक गुणधर्म असतात. यामुळे पिठाला कीड लागण्याचा किंवा ओलाव्यामुळे ते खराब होण्याचा धोका कमी होतो.
आयुर्वेदानुसार, चांदीला शीत धातू मानले जाते. त्यामुळे, पिठाच्या डब्यात चांदीचे नाणे ठेवल्याने शरीरातील उष्णता संतुलित राहण्यास मदत होते.
पचनक्रिया आणि रोगप्रतिकारशक्ती चांगली राखण्यासाठीही चांदीच्या नाण्याची ही युक्ती फायदेशीर मानली जाते.
पिठाच्या डब्यात चांदीचे नाणे ठेवणे धार्मिकदृष्ट्याही शुभ मानले जाते. चांदी हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते.
स्वयंपाकघरातील कपाटात चांदीचे नाणे ठेवल्याने घरात समृद्धी येते आणि सर्व नकारात्मकता दूर राहते. असेही मानले जाते की, अशा घरात अन्नाची कधीही कमतरता भासत नाही.
प्राचीन काळात जेव्हा हवाबंद डब्बे उपलब्ध नव्हते, तेव्हा धान्य ताजे ठेवण्यासाठी आणि कीटक, आर्द्रतेमुळे ते खराब होण्यापासून वाचवण्यासाठी ही नैसर्गिक पद्धत वापरली जात असे.
नेहमी शुद्ध चांदीचे नाणे वापरा.पिठाच्या डब्यात ठेवण्यापूर्वी चांदीचे नाणे पूर्णपणे धुऊन स्वच्छ करा. शिवाय, पीठ संपल्यावर, ते स्वच्छ करूनच डब्यात परत ठेवा. जर चांदीचे नाणे काळे किंवा हिरवे होऊ लागले असेल, तर ते अजिबात वापरू नका.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.