Shreya Maskar
अनेकजण मोबाईल फोन शर्टच्या पुढच्या खिशात ठेवतात. फोन सतत जवळ असल्याने कॉल, मेसेज आणि नोटिफिकेशन पाहणे सोपे जाते. मात्र, शर्टच्या खिशात फोन ठेवल्याने हृदयाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो जाणून घेऊयात.
मोबाईल फोनमधून रेडिओफ्रिक्वेन्सी (RF) ऊर्जा उत्सर्जित होते. त्यामुळे फोन हृदयाजवळ ठेवल्याने हृदयाची धडधड वाढू शकते.
ज्या व्यक्तींच्या छातीत पेसमेकर किंवा हृदयाचे ठोके नियंत्रित करणारे इलेक्ट्रॉनिक उपकरण बसवलेले आहे, त्यांनी फोन शर्टच्या खिशात ठेवणे टाळावे.
फोन खिशात ठेवण्याऐवजी बॅगमध्ये ठेवण्याची सवय लावा. जेणे करून मोबाईची थेट छातीशी जवळीक कमी होईल.
फोन वापरताना धडधड, चक्कर किंवा अस्वस्थता जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा बेशुद्ध पडल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्या.
सतत फोन पाहण्यामुळे झोपेवर किंवा मानसिक तणावावर परिणाम होत असल्यास स्क्रीन टाइम कमी करा.
जास्त चहा-कॉफी पिणे, ताणतणाव, कमी पाणी पिणे, झोप न लागणे यामुळेही हृदय धडधड वाढते आणि कमी होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.