ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
एसी चालू असताना प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न येतो. तो म्हणजे एसीसोबत पंखाही चालवावा की नाही? काही लोक पंखा बंद करतात तर काहीजण तो चालू ठेवतात.
एसी चालू असताना फॅन चालू ठेवावा की नाही, जाणून घ्या.
पंखा चालू असताना, खोलीतील थंड हवा एकाच ठिकाणी न राहता, तर ती प्रत्येक कोपऱ्यात पसरते. यामुळे खोली लवकर थंड होते.
जेव्हा खोली लवकर थंड होते, तेव्हा जास्त वेळ एसी चालवण्याची गरज नसते. यामुळे विजेची बचत होते. आणि लाइट बिल कमी येते.
प्रत्येक वेळी एसीसोबत पंखा चालवणे आवश्यक नाही. जर तुमची खोली लहान असेल आणि त्यात जास्त टनचा एसी बसवला असेल, तर पंखा नसतानाही खोली लवकर थंड होऊ शकते.
एसी चालवताना खोलीचा आकार आणि एसीची क्षमता लक्षात घेऊनच फॅन चालू ठेवावा की नाही याचा निर्णय घ्या.
जर तुम्हाला वाटत असेल की थंड हवा समान रीतीने पसरत नाही, तर पंखा चालवणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.