Dhanshri Shintre
व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी अनेक सुरक्षा आणि प्रायव्हसी फीचर्स देतं, जे त्यांच्या सुरक्षिततेसाठी उपयुक्त ठरतात.
तुमच्या परवानगीशिवाय कोणी व्हॉट्सअॅप उघडू नये, यासाठी अॅपमध्ये एक महत्त्वाची सेटिंग सक्रिय करणं आवश्यक आहे.
तुमच्या फोनमध्ये WhatsApp सुरू करा आणि नंतर उजव्या कोपऱ्यातील सेटिंग्ज चिन्हावर टॅप करा.
यानंतर, अनेक पर्यायांमधून प्रायव्हसी सेटिंग निवडणं आवश्यक असतं.
प्रायव्हसीमध्ये जा, खाली स्क्रोल करा आणि अॅप लॉक पर्यायावर टॅप करा.
यानंतर, Require Face ID पर्यायाजवळच्या टॉगलवर टॅप करून तो सक्रिय करा.
आता चार पर्याय दिसतील, त्यातून Immediately निवडा. म्हणजे अॅप बंद होताच लगेच लॉक होईल.
हे स्टेप्स फक्त आयफोनसाठी आहेत. अशाप्रकारे तुम्ही तुमच्या आयफोनवर व्हॉट्सअॅप सुरक्षितपणे लॉक करू शकता.
जर तुम्ही अँड्रॉइड वापरत असाल, तर व्हॉट्सअॅप लॉक करण्याची सोय त्यातही आहे. काही स्टेप्स आयफोनपेक्षा वेगळ्या असतील.