ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अगदी काही दिवसांमध्ये अनेकांच्या घरामध्ये गणरायाचे आगमन होणार आहे.
घरामध्ये गणरायाची प्राणप्रतिष्ठाण करण्यापूर्वी या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
घरातील ज्या ठिकाणी गणराया विराजमान होणार आहे त्या जागेचं शुद्धीकरण केल्यानंतर तिथे लाल कपडा पसरवून ठेवा.
त्यानंतर घरातील गणरायाच्या छोट्या मूर्तीला गंगाजलने स्नान घालून शुद्ध करून घ्या.
गणरायाच्या शेजारी रिद्धी-सिद्धीची मूर्ती किंवा दोन्ही बाजून दोन सुपाऱ्या ठेवा.
गणरायाच्या उजव्या बाजूला तांब्याच्या कलशामघ्ये पाणी ठेऊन त्यामध्ये चांदिचं नाणं ठेवा.
गणरायाला प्रसन्न मनाने फुलं, मिठाई आणि दुर्वा अर्पण करा यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होईल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.