ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आयुर्वेदानुसार, सूर्यास्तानंतर तेल लावणे टाळावे. नेहमी दिवसा केसांना तेल लावणे कधीही चांगले राहील.
तज्ज्ञांच्या मते केसांना तेल लावल्यानंतर ३-४ तासांनी केस धुवावेत.
रात्रभर केसांना तेल लावून ठेवल्यास केसांमध्ये धूळ साचते आणि केस कमकुवत होतात.
तेलकट टाळूला कधीही तेल लावणे टाळावे. त्यामुळे केसगळती वाढते.
तुमचे केस तेलकट असतील तर केसांना एलोवेरा जेल ने मालिश करा. त्यामुळे केस मऊ होतात.
वारंवार केसांना तेल लावल्यास मोठ्या प्रमाणात केसगळती सुरु राहते.
तुमच्या केसात कोंडा असल्यास केसांना तेल लावू नये. त्यामुळे केस कोरडे होतात.
केसामध्ये असलेला कोंडा घालवण्यासाठी एलोवेरा जेलमध्ये कडुलिंबाची पाने टाकून त्यांची पेस्ट करून घ्यावी. यामुळे टाळू कोरडा होऊन केसांतील कोंडा दूर होईल.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.