ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळा सुरु होताच प्रत्येक गृहींणीची घरच्या घरी मसाले करण्याची गडबड सुरु होते.
त्यासाठी बाजारातून अनेक मसाल्यांचे साहित्य खरेदी करतात.
मात्र मसाले तयार करताना मिरच्यांची निवड योग्य होणे अत्यंत गरजेचे असते.
मिरची पुर्णपणे वाळलेली असावी असावी त्यासाठी काही मिरच्या घ्या मधोमध हाताने तोडून पहा.
जर मिरची पटकन तुटली तर योग्य मिरचीची निवड झाली समजावी.
बेडगी रायचूर ,बेडकी जातवान, बेडकी हवेरी, बेडकी बेलारी,गुंटूर तसेत काश्मिरी तिखट अशा मिरच्यांची खरेदी करावी. याने तिखटपणा आणि रंग चांगला येतो.
मिरच्या खरेदी करताना लक्षात ठेवा की ज्या मिरच्या कमी लांबीच्या असतात त्या तिखट असतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.