ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
काही दिवसांत मुलांच्या शाळा सुरु होणार आहेत त्यासोबत पावसाळाही सुरु होत आहे.
त्यासाठी प्रत्येकजण मुलांसाठी रेनकोट आणि विविध वस्तू विकत घेत आहे.
त्यातील महत्त्वाची गोष्ट रेनकोट मात्र रेनकोट खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.
नवीन नवीन रेनकोट खरेदी करताना रेनकोटचे मटेरीयल वॉटरप्रूफ आहे का नाही ते तपासून घ्यावे.
रेनकोट खरेदी करताना ते मुलांना एकदा घालून बघावे, घट्ट रेनकोट घातल्याने मुलांना त्रास होऊ शकतो.
नवीन रेनकोट खरेदी करताना रेनकोटची शिलाई चेक करावी, कायम मशीन शिलाई असलेले रेनकोट खरेदी करावे.
नवीन रेनकोट खरेदी करताना त्यावरील डिझाईन न पाहता योग्य पद्धतीने शरीर छाकले जाते का ते पाहावे.
रेनकोटचे मटेरियल जास्त पातळ असू नये याची काळजी घ्यावी.