Dhanshri Shintre
झोपेतली स्वप्न क्षणिक असतात, पण जी स्वप्न झोप उडवतात, तीच तुम्हाला यशाच्या वाटेवर नेतात.
अपयश ही यशाची सुरूवात असते, कारण प्रत्येक चुका आपल्याला नवीन धडे देऊन पुढे जाण्याची दिशा दाखवतात.
इच्छा असेल तिथे मार्ग सापडतो, मेहनत घेतली तर नशीब साथ देतं आणि यश आपोआप मिळतं.
फक्त स्वप्न पाहून थांबू नका, त्यासाठी झेप घ्या; आकाशाला गवसणी घालण्यासाठी कृतीच गरजेची असते.
अडचणी कितीही असल्या तरी हसू टिकवा, कारण हसणं दुःख हलकं करतं आणि मनाला शांतता देते.
मन मजबूत आणि विश्वास ठाम असेल, तर कोणतीही उंची गाठणे अशक्य नसते, डोंगरही सहज सर करता येतो.
स्वतःवर नितांत विश्वास असेल, तर इतरांच्या मंजुरीची गरज लागत नाही, तो आपोआप विजयी ठरतो.
वेळ हीच खरी संपत्ती आहे, ती एकदा गेली की परत येत नाही, म्हणून तिचा योग्य वापर करावा.