Tanvi Pol
पावसाळ्यात वातावरण थंड असल्याने प्रत्येक पालक घरात असलेल्या चिमुकल्यांना पायात मोजे घालतात.
लहान मुलांच्या पायात मोजे घातल्याने त्यांचा थंडीपासून बचाव होतो शिवाय आरोग्याच्या समस्यांपासूनही दूर राहता येते.
मात्र लहान चिमुकल्यांना मोजे घालताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते जाणून घेऊयात.
लहान मुलांना कायमच नेहमी कोरडे आणि स्वच्छ मोजे वापरा.
पावसात भिजलेले मोजे लगेच बदलावे, कारण चिमुकल्यांना संसर्ग होऊ शकतो.
कॉटन किंवा अँटी-बॅक्टेरियल फॅब्रिकचे मोजे कधीही विकत घ्यावे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.