Saam Tv
वास्तू शास्त्रानुसार मोर पीस घरात ठेवल्याने अनेक फायदे आणि सुख-समुद्धी येते.
तुम्हाला पैशांच्या समस्या जाणवत असतील तर तुम्ही मोर पीसांचा वापर करू शकता.
पुढे आपण मोर पीस घरात कुठे ठेवावे आणि त्याचा फायदा काय होतो? हे जाणून घेणार आहोत.
घरातील देवाऱ्यात मोर पीस ठेवल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळतील.
घरात सतत वाद-विवाद होत असतील देवाऱ्यामध्ये मोर पीस ठेवावे.
मोर पीस घरात ठेवल्याने नकारात्मकता घरात प्रवेश करत नाही.
देवाऱ्यातील लक्ष्मी देवीच्या मुर्तीसमोर मोर पीस ठेवल्याने लक्ष्मी प्रसन्न होते.
तुम्ही तिजोरीत किंवा कपाटात मोर पीस ठेवू शकता. त्याने तुमची धन-दौलत वाढत राहते.