Sakshi Sunil Jadhav
मंदार शिंदे हे नावाजलेले मराठी दिग्दर्शक, सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांचे धाकटे बंधू आणि शाहीर कृष्णराव साबळे यांची नातवंडं आहेत.
मंदार शिंदे यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक लोकप्रिय मालिका, सिनेमे आणि मोठ्या इव्हेंट्सचे दिग्दर्शन व निर्मिती केली आहे.
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मंदार शिंदे यांनी त्यांच्या आयुष्यातील चढ-उतार आणि इंडस्ट्रीमधील कटू अनुभवांबाबत स्पष्टपणे सांगितलं.
सध्या एका व्यापाऱ्याकडे ड्रायव्हिंगची नोकरी करत असल्याचं मंदार शिंदे यांनी सांगितलं. कुटुंब चालवण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागल्याचं त्यांनी नमूद केलं.
“TRP मिळत होती, यश मिळत होतं, मग ते फक्त कलाकारांमुळेच होतं का? कॅमेरामागचा दिग्दर्शक नव्हता का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
एका कठीण काळात केदार शिंदेंनी शूटिंगला बोलावलं, मात्र तेव्हा कलाकारांचे कपडे-चपला नेण्याचं काम करावं लागलं आणि त्यासाठी १०० रुपये मिळायचे, असं त्यांनी सांगितलं.
स्वतः दिग्दर्शित करत असलेला एक चित्रपट अचानक ४-५ दिवसांतच निर्मात्याने बंद केल्याने त्यांच्या कारकिर्दीला मोठा फटका बसल्याचं त्यांनी उघड केलं.
“मराठी इंडस्ट्रीला आजही कंपूंचा शाप आहे. काम चांगलं असलं तरी संधी मिळत नाही,” असं मत मंदार शिंदे यांनी मांडलं.