Shreya Maskar
पावसाळ्यात ट्रेकिंगचा आनंद घ्या. तुम्ही वीकेंडला मित्रांसोबत ट्रिप प्लान करा. कावळ्या किल्ला ट्रेकिंगसाठी बेस्ट लोकेशन आहे.
कावळ्या किल्ला (कावळ्यागड) हा पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर, वरंध घाटात स्थित आहे. मुंबई- पुण्याच्या पर्यटकांसाठी हे सुंदर लोकेशन आहे.
पावसाळ्यातील ट्रेकिंगसाठी लोकप्रिय असलेले हे ठिकाण दरीचे विहंगम दृश्य, आजूबाजूचे धबधबे आणि खडकात कोरलेले वाघजाई मातेचे मंदिर यांसाठी प्रसिद्ध आहे.
कावळ्या किल्ला वरंध घाटाच्या वर उत्तर-दक्षिण दिशेने पसरलेल्या डोंगराच्या एका भागावर स्थित आहे. या घाटातून जाणाऱ्या ऐतिहासिक रस्त्याच्या बांधकामामुळे, अरुंद आणि टेकडीसारखा दिसणारा हा डोंगर प्रत्यक्षपणे दोन स्वतंत्र भागांमध्ये विभागला गेला आहे.
कावळ्या किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एक मोक्याचा लष्करी टेहळणी बुरूज म्हणून कार्यरत होता. या ठिकाणाहून पुणे शहराला किनारपट्टीवरील कोकण प्रदेश आणि रायगड या राजधानीच्या किल्ल्याशी जोडणाऱ्या वरंध घाटातील महत्त्वाच्या व्यापारी व दळणवळण मार्गावर लक्ष ठेवले जात असे.
कावळ्या किल्ला हा १७ व्या शतकातील आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोरे घराण्याकडून आजूबाजूचा जावळीचा प्रदेश जिंकून घेतल्यावर हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला.
कावळ्या किल्ल्याला पोहचण्यासाठी पुणे स्टेशनला उतरून पुढे तुम्ही किल्ल्याच्या पायथ्याच्या गावापर्यंत रिक्षाने जाऊ शकता. त्यानंतर कावळ्या किल्ल्यावर जाण्यासाठी ट्रेकिंग करा.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.