Manasvi Choudhary
अभिनेता विकी कोशल आणि कतरिना कैफ ७ नोव्हेंबर २०२५ रोजी आई - बाबा झाले आहेत. विकी कोशल आणि कॅटरिना कैफ यांना मुलगा झाला आहे.
या दोघांनीही दोन महिन्यानंतर मुलाचे नाव ठेवलं आहे. चाहत्यांनाही या विकी कोशल आणि कतरिना कैफ मुलाचं नाव काय ठेवणार याची उत्सुकता होती.
सोशल मिडिया पोस्टच्या माध्यमातून विकी कोशल आणि कॅटरिना कैफ यांनी मुलाचं नाव सांगितलं आहे.
विकी कोशल आणि कॅटरिना कैफच्या मुलाचं नाव विहा कौशल असे आहे.
विहान हे संस्कृत भाषेतील नाव आहे. ज्याचा अर्थ पहाट, सूर्योदय किंवा सकाळचा प्रकाश असा होतो.
विहान' हे नाव नवीन सुरुवात, प्रकाश आणि आशेचे प्रतीक मानले जाते.
सोशल मीडियावर विकी कोशल आणि कॅटरिना कैफच्या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.