Dhanshri Shintre
काश्मिरी पद्धतीचा पुलाव आपल्या सुगंधी मसाल्यांनी, सुक्या मेव्याने, आणि अनोख्या चवीने प्रसिद्ध आहे.
शाकाहारींना हा पुलाव खूप आवडतो. चला, त्याची रेसिपी जाणून घेऊया.
बासमती तांदूळ, साजूक तूप, तेजपत्ता, लवंग, दालचिनी तुकडा, जायफळ पूड, साखर, दूध, पाणी, सुकामेवा(बदाम, काजू, मनुका), केशर, मीठ
कढईत तूप गरम करा आणि सुकामेवा सोनेरी रंग येईपर्यंत परतून बाजूला ठेवा.
त्याच तुपात तेजपत्ता, लवंग, दालचिनी टाकून फोडणी द्या.
भिजवलेले तांदूळ घालून हलक्या हाताने परता, सुगंध येईपर्यंत परता.
त्यात दूध, पाणी, साखर, केशर आणि मीठ घाला. चांगले हलवून झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजवा.
तांदूळ पूर्ण शिजल्यावर सुकामेवा टाका आणि जायफळ पूड शिंपडा.
हलक्या हाताने मिक्स करून पाच मिनिटे झाकून ठेवा.
गरमागरम काश्मिरी पुलाव कोरड्या भाज्यांबरोबर किंवा दह्याबरोबर सर्व्ह करा.
NEXT: रेस्टॉरंटसारखी खास टोमॅटो सूपची चव घरच्या घरी कशी अनुभवाल? फॉलो करा ही झटपट रेसिपी