Dhanshri Shintre
रेल्वेमध्ये मिळणाऱ्या खास टोमॅटो सूपचा स्वाद घरच्या घरी अनुभवायचा आहे? झटपट बनवा ही रेसिपी.
टोमॅटो, कांदा, लसणाच्या पाकळ्या, आल्याचा छोटा तुकडा, हिरव्या मिरच्या, तेल, पाणी, धणे, काळीमिरी पावडर, साखर, गाजर, लोणी, कॉर्नफ्लोअर, मिरची पावडर, हळद, मीठ, ब्रेड क्रूटन्स
एका भांड्यात टोमॅटो, गाजर, कांदा, लसूण, आणि 3 कप पाणी घालून 10-15 मिनिटे उकळून घ्या आणि ते थंड करायला ठेवा.
शिजवलेले मिश्रण गार झाल्यावर मिक्सरमध्ये पेस्ट बनवा. गाळणीने गाळून मऊसर सूप तयार करा.
गाळलेले सूप परत भांड्यात घालून गॅसवर ठेवा. त्यात मिरे पूड, साखर, आणि मीठ घाला. उकळी आणा.
तयार कॉर्नफ्लोअरचे पाणी सूपमध्ये मिसळा. सूप घट्ट होईपर्यंत हलवत राहा.
शेवटी लोणी घालून सूप छान ढवळा.
गरमागरम सूप वाडग्यात काढून त्यावर ब्रेड क्रूटन्स टाका आणि सर्व्ह करा.
NEXT: हिरव्या मिरचीचे लोणचे बनवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स