Dhanshri Shintre
भारतीय स्वयंपाकात लोणची ही चवदार गोष्ट आहे. ते साध्या जेवणाला रोमांचक करतात. हिरव्या मिरचीचे लोणचे घरी बनवताना या टिप्स वापरा आणि ते स्वादिष्ट बनवा.
ताज्या, टवटवीत हिरव्या मिरच्यांचा वापर करा. जुने आणि सुरकुतलेले मिरच्या टाळा, कारण त्या लोणच्याची चव बिघडवू शकतात.
चव बिघडू नये म्हणून मिरच्या नीट स्वच्छ धुवा. लोणचे बनवण्यापूर्वी मिरच्यांची देठ काढायला मात्र विसरु नका.
ओलसरपणा लोणच्याला नासवू शकतो. मिरच्या धुतल्यानंतर, त्या पूर्णपणे वाळवा. वाळलेल्या मिरच्यांनी लोणचे ताजे आणि टिकाऊ राहते.
पांढरे व्हिनेगर केवळ संरक्षक नाही, ते लोणच्याला ताजेपणा राखण्यास मदत करते आणि त्याला एक झणझणीत चव देते.
मोहरीचे दाणे, हळद, लाल मिरची पावडर, मेथी, आणि मीठ योग्य प्रमाणात वापरा. मसाले योग्य प्रमाणात भाजून घ्या, जेणेकरून त्यांची चव वाढेल.
मोहरीचे तेल लोणच्याला पारंपरिक चव देते. ते गरम करा, गार होऊ द्या, आणि मग ते लोणच्यात मिसळा.
लोणचं स्वच्छ, कोरड्या काचेच्या बरणीत ठेवा. हवाबंद झाकणाचा वापर करा आणि बरणी थंड व कोरड्या ठिकाणी ठेवा.
NEXT: आरोग्याच्या प्रत्येक उत्तम गरजेसाठी रोज खा सूर्यफुलाचे बिया, जाणून घ्या फायदे