Shreya Maskar
काश्मिरी कहवा बनवण्याठी काश्मिरी ग्रीन टी, बदाम, दालचिनी, लवंगा, काळी मिरी, आलं, वेलची, बडीशेप, गुलाबाच्या पाकळ्या,सुंठ पावडर आणि केशर इत्यादी साहित्य लागते.
काश्मिरी कहवा बनवण्याठी पॅनमध्ये 1 ग्लास पाणी छान उकळून घ्या.
पाण्यात बारीक चिरलेले बदाम, दालचिनीचे तुकडे, लवंग, काळी मिरी घाला.
एक उकळी आल्यावर सुंठ पावडर, बडीशेप घालून मिक्स करा.
त्यानंतर वेलची, वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या आणि केशर टाका.
शेवटी यात काश्मिरी ग्रीन टी घालून चांगले उकळून घ्या.
चहा चांगला उकळला की गाळून घ्या.
तुम्ही चहाची चव वाढवण्यासाठी यात मध घालू शकता.