Shreya Maskar
काश्मिरी काहवा बनवण्यासाठी ग्रीन टी,बदाम, दालचिनी, लवंगा, काळी मिरी,आलं, वेलची, बडीशेप, आणि केशर इत्यादी साहित्य लागते.
काश्मिरी काहवा बनवण्यासाठी सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या खूप महत्त्वाच्या आहेत.
काश्मिरी काहवा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये पाणी घालून बदामाचे काप घाला.
त्यानंतर यात दालचिनी, लवंग, काळी मिरी, आलं, बडीशेप, वेलची घालून छान उकळून घ्या.
मग या मिश्रणात सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या, केशर घाला.
शेवटी चहामध्ये काश्मिरी ग्रीन टी घालून चांगले उकळा.
तुम्ही त्यात तुमच्या आवडीनुसार मधही घालू शकता.
अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या काश्मिरी काहवासोबत काश्मीरचा आनंद घेऊ शकता.