ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
काश्मीरच्या खोऱ्यात वसलेल्या पहलगाम येथे काल दहशतवादी हल्ला झाला.
पहलगाम येथे जवळपास २८ पर्यटकांवर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला.
पहलगाम हे नक्की आहे तरी कुठे? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
पहलगाम हे जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यामध्ये आहे.
पहलगाम हे त्याच्या हिरव्यागार निसर्गासाठी आणि हिमनदीसाठी ओळखले जाते.
अनंतनाग शहरापासून अवघ्या ४५ किलोमीटर अंतरावर हे शहर वसलेले आहे.
पहलगामला मेंढपाळांची दरी म्हणूनदेखील ओळखले जाते. येथे अनेकजण मेंढ्या चरण्यासाठी घेऊन येतात.
पहलगाम हे खूप सुंदर ठिकाण आहे. येथे तुम्हाला निसर्गसौंदर्याचा उत्तम अनुभव मिळेल.
पहलगाममधून डोळ्याचे पारणे फेडणारे निसर्गाचे दृश्य तुम्ही पाहू शकतात.आजूबाजूला खोल दऱ्या, डोंगरांमध्ये वसलेले हे ठिकाण आहे.