ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सारेगमप फेम गायिका कार्तिकी गायकवाड नेहमीच चर्चेत असते.
कार्तिकी गायकवाडच्या घरी सध्या लग्नसराई सुरु आहे.
कार्तिकीच्या भावाचे कोस्तुभ गायकवाडचे लग्न झाले आहे.
कौस्तुभच्या लग्नासाठी कार्तिकीने नऊवारी साडी नेसून खास मराठमोळा लूक केला आहे.
कार्तिकीने क्रिम कलरची नऊवारी साडी नेसली आहे. त्यावर छान खोपा स्टाईल हेअरस्टाईल केली आहे.
कार्तिकीने नाकात नथ, गळ्यात मंगळसूत्र अन् कपाळी चंद्रकोर लावली आहे.
कार्तिकीने हातात छान हिरवा चुडा भरला आहे.
कार्तिकीने भावाच्या लग्नासाठी खास हातभर मेहंदी काढली आहे. या मेहंदीवर मानाची कलवरी असं लिहलं आहे.