Ruchika Jadhav
ठाण्यातील उपनगरांमधील कर्जत हे एक शहर आहे. निसर्गाच्या सानिध्यात वेढलेल्या या ठिकाणी अनेक पाहण्यासारख्या गोष्टी आहेत.
कोंडाणा लेणी सुद्धा येथील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. येथील वास्तूनवर भरपूर कोरीवकाम करण्यात आलंय.
कर्जतमधील या कोथळीगडावर अनेक व्यक्ती ट्रेकिंगसाठी येत असतात.
कर्जतपासून काही किलोमिटर अंतरावर भिवपूरी धबधबा आहे. पावसाळ्यात या ठिकाणी मोठी गर्दी उफाळून येते.
उल्हास दरी सुद्धा कर्जतमधीलच एक प्रसिद्ध दरी आहे. येथे प्रचंड शांतता आणि गारवा असतो. पर्यटक या ठिकाणी सुद्धा फिरण्यासाठी येतात.
कर्जतमध्ये एक पाली भुतिवली धरण आहे. सूर्यास्ताच्यावेळी येथील नजारा डोळ्यांना सुखावणारा असतो.
कर्जतमधला भोर घाड सुद्धा एक प्रसिद्ध ठिकाण आहे. या घाडात अनेक नागमोडी वळणं आहेत.
कर्जतमधला एनडी स्टुडीओला सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता. येथे अनेक चित्रपटांचं शुटींग झालं आहे.