Shreya Maskar
कर्जत जवळील पळसदरी म्हणजे निसर्गाचा अद्भुत नजारा होय.
येथे पळसाची झाडे आणि दरी आहेत. यामुळे या ठिकाणाचे नाव पळसदरी ठेवण्यात आले.
तुम्ही खोपोलीच्या ट्रेनने पळसदरी रेल्वेस्टेशनला उतरून या ठिकाणी पोहचू शकता.
हिवाळा आणि पावसाळा हा पळसदरी भेट देण्यासाठी उत्तम काळ आहे.
पळसदरीला जवळच श्री स्वामी समर्थांचा मठ देखील आहे.
मठाचे वातावरण मन तृप्त करून टाकते.
पर्यटक आणि स्थानिक लोक येथील धबधब्याखाली चिंब भिजायला येतात.
पळसदरी निसर्ग सौंदर्याने समृद्ध असून येथे तलाव देखील आहे.