Manasvi Choudhary
कारले आणि कडुलिंबाचे औषधी गुणधर्म आहे. कारले आणि कडुलिंबाचा रस सकाळी रिकाम्यापोटी प्यायल्याने आरोग्याला फायदा होतो.
लिव्हर स्वच्छ करण्यासाठी आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासाठी कारले आणि कडुलिंबाचा रस आवर्जून पितात.
या दोन्ही रसांची गुणधर्म शरीर निरोगी करण्यासाठी असला तरी या दोन्ही रसांचे फायदे वेगवेगळे आहेत.
कारल्याच्या रस हा मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी उपयोगी आहे. कारल्याच्या रसामध्ये पॉलीपेप्टाइड-पी असते, जे इन्सुलिनसारखे काम करू शकतात आणि रक्तातील साखर नियंत्रित करतात.
कडुलिबांच्या रसामध्ये दाहक- विरोधी गुणधर्म आणि अँटीऑक्सिडंटस भरपूर प्रमाणात असतात यकृत निरोगी ठेवते. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते.
सकाळी रिकाम्यापोटी कारल्याचा रस प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत होते व दररोज याचे सेवन केल्याने मधुमेह नियंत्रणात राहते.
कडुलिंबामध्ये इन्सुलिन प्रतिरोध गुणधर्म असतात यामुळे रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी कडुलिंबाचा रस फायदेशीर आहे.
व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिड्ंटस समृद्ध कारल्याचा रस प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते. त्वचा निरोगी राहते.
नियमितपणे कारल्याचा रस प्यायल्याने त्वचेवरील मुरूम, पुळ्या कमी होतात.
कडुलिंबाचा रस हा डॉक्टराच्या सल्ल्याशिवाय जास्त प्रमाणात घेऊ नका. गर्भवती महिलांनी कडुंलिंबाचा रस पिऊ नये.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.