Siddhi Hande
आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे. अनेकांचे श्रावणी सोमवारचे व्रत असते.
श्रावण महिन्यातील सोमवारी उपवास धरतात. कारेगावच्या सरपंच निर्मला नवले यांनीदेखील श्रावणी सोमवारचे व्रत केले आहे.
निर्मला नवले यांनी आज सकाळीच शंकराच्या पिडींचं दर्शन घेत पूजा केली आहे.
निर्मला नवले आणि त्यांचे पती शुभम नवले यांनी एकत्र पूजा केली आहे.
निर्मला नवले यांनी पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. त्यांनी सकाळी सकाळी शंकराच्या पिंडीवर बेल वाहून पूजा केली आहे.
निर्मला यांनी पतीसह भगवान शिवशंकराच्या पिंडीची आरतीदेखील केली आहे.
निर्मला या खूप भक्तीभावाने पूजा करताना दिसत आहे. त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
निर्मला नवले या सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहेत. त्यांचे लाखो फॉलोवर्स आहेत.
Next: श्रावणात रोज नक्की करा हे ५ उपाय; मिळेल सुख, शांती आणि आर्थिक स्थैर्य