Shruti Vilas Kadam
दिल्लीतील एका खास फॅशन इव्हेंटमध्ये करीना कपूर खानने लेपर्ड प्रिंट साडी परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिचा हा रॉयल आणि स्टायलिश अवतार सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
करीनाची ही साडी सुप्रसिद्ध डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांच्या कलेक्शनमधील आहे. मात्र करीना आणि तिच्या स्टायलिस्टने या साडीला थोडा आधुनिक ट्विस्ट देत ती ग्लॅमरस बनवली आहे.
साडी शिफॉन फॅब्रिकची असून त्यावर येलो आणि ब्लॅक लेपर्ड प्रिंट आहे. या प्रिंटमुळे पारंपरिक साडीला एक दमदार आणि आत्मविश्वासपूर्ण लुक मिळाला आहे.
करीनाने साडीचा पल्लू एका खांद्यावर सहजतेने टाकलेला होता. ही ड्रेपिंग स्टाईल तिच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक एलिगंट आणि ग्रेसफुल बनवते.
साडीबरोबर तिने घातला होता मॅचिंग लेपर्ड प्रिंट डीप नेक ब्रालेट ब्लाउज आणि त्यावर केप स्टाईल स्लीव्स. या संयोजनाने तिच्या संपूर्ण लुकला आधुनिकतेचा स्पर्श दिला.
करीनाने या साडीसोबत घातला होता कुंदनचा भारी हार, झुमके आणि अंगठ्या, ज्यामुळे तिच्या लुकमध्ये एक राजेशाही थाट जाणवतो. ती खऱ्या अर्थाने ‘बॉलीवूड बेगम’ दिसत होती.
तिने न्यूड मेकअप, ओपन वेव्ही हेअरस्टाइल आणि ब्लॅक पॉइंटेड हील्स निवडल्या. या साध्या पण परफेक्ट टचमुळे तिचा संपूर्ण लुक आकर्षक वाटतो.