Rakul Preet Singh: रकुलप्रित सिंंगची ही स्किन केअर रूटीन करा फॉलो, तुमचीही त्वचा करेल ग्लो

Shruti Vilas Kadam

रकुल प्रीत सिंग

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग तिच्या चमकदार त्वचेसाठी महागडी सौंदर्यप्रसाधने नव्हे, तर घरी बनवलेले नैसर्गिक उपाय वापरते. तिच्या मते, त्वचेचं खरं सौंदर्य हे निसर्गातूनच येतं.

Rakul Preet Singh

बेसन आणि हळद

रकुलच्या फेसपॅकचा मुख्य घटक बेसन आणि हळद आहेत. हे दोन्ही घटक त्वचा उजळवतात आणि त्वचेतील अतिरिक्त तेल कमी करून तिला नैसर्गिक तेज देतात.

Rakul Preet Singh

दही आणि लिंबाचा वापर

ती या फेसपॅकमध्ये दही आणि लिंबाचा रस मिसळते. दही त्वचेला मऊ आणि गुळगुळीत करते, तर लिंबातील सिट्रिक ऍसिड त्वचेवरील काळेपणा आणि टॅन कमी करण्यात मदत करते.

Rakul Preet Singh

तयार करण्याची पद्धत

एका बाऊलमध्ये २ चमचे बेसन, चिमूटभर हळद, १ चमचा दही आणि काही थेंब लिंबाचा रस घालून नीट मिक्स करावे. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून १० ते १५ मिनिटे सुकू द्यावे आणि मग कोमट पाण्याने धुवून टाकावे.

Rakul Preet Singh

बेसनचे फायदे

बेसन हा एक नैसर्गिक क्लिन्झर आहे. तो त्वचेवरील मळ, तेल आणि मृत कोशिका काढून टाकतो. नियमित वापर केल्यास त्वचा ताजीतवानी आणि मऊ होते.

Rakul Preet Singh

हळद, दही आणि लिंबाचे फायदे

हळद: सूज आणि पिंपल्स कमी करून त्वचेला नैसर्गिक ग्लो देते. दही: त्वचेतील ओलावा टिकवते आणि कोरडेपणा कमी करते. लिंबू: डाग, पिग्मेंटेशन आणि टॅनिंग कमी करून त्वचा उजळते.

Rakul Preet Singh

सूचना

रकुल सांगते की हा फेसपॅक आठवड्यातून दोनदा वापरावा. पण प्रत्येकाची त्वचा वेगळी असल्याने, संवेदनशील त्वचा असल्यास प्रथम पॅच टेस्ट करावी. आवश्यक असल्यास त्वचारोगतज्ञांचा सल्ला घ्यावा.

Rakul Preet Singh

Urmila Kanetkar: ती परी असमानीची....; निसर्गरम्य वातावरण आणि उर्मिलाच्या मनमोहक अदा

Urmila Kanetkar
येथे क्लिक करा