Surabhi Jayashree Jagdish
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई हे पावसाळ्यात फिरण्यासाठी एक सुंदर ठिकाण आहे.
हिरवीगार वनराई, धबधबे आणि शांत वातावरण यामुळे पावसाळ्यात या उद्यानाचे सौंदर्य अधिकच वाढतं.
पावसाळ्यात जर तुम्हाला एका दिवसाची पिकनीक काढायची असेल आणि लांबही जायचं नसेल तर नॅशनल पार्क हा एक उत्तम पर्याय ठरतो.
ही प्राचीन बौद्ध लेणी आहेत, जी उद्यानाच्या मध्यभागी डोंगरांमध्ये आहेत. पावसाळ्यात इथले वातावरण खूप शांत आणि हिरवेगार असते. लेण्यांमध्ये असलेली कोरीव कामे आणि बुद्ध मूर्ती पाहण्यासारखी आहेत.
उद्यानामध्ये अनेक निसर्गरम्य मार्ग आहेत, जिथे तुम्ही चालण्याचा आनंद घेऊ शकता. पावसाळ्यात इथली झाडी अधिक घनदाट होते आणि विविध प्रकारचे वन्यजीव आणि पक्षी पाहायला मिळतात.
हे दोन्ही तलाव उद्यानाच्या आतमध्ये आहेत आणि पावसाळ्यात पूर्ण भरलेले असतात. तलावांच्या काठावर बसून निसर्गाचा आनंद घेणे खूप शांततापूर्ण अनुभव असतो.
या ठिकाणी विविध प्रकारची बांबूची झाडे आहेत. पावसाळ्यात बांबूची हिरवीगार गर्द झाडी खूप सुंदर दिसते.
पावसाळ्यात उद्यानात काही ठिकाणी छोटे धबधबे तयार होतात, जे पाहण्यासाठी खूप सुंदर असतात.