Siddhi Hande
कांद्याची पात ही शरीरासाठी पौष्टिक असते. परंतु कांद्याच्या पातीची भाजी खाण्यासाठी लहान मुले नाक मुरडतात.
तुम्ही घरीच कांद्याच्या पातीचे भजी बनवू शकतात. कांद्याच्या पातीचे भजी बनवू शकतात.
कांद्याची पात, बेसन पीठ, ओवा, मीठ, मिरची पावडर, मसाला
भजी बनवण्यासाठी सर्वात आधी कांद्याची पात स्वच्छ धुवून घ्या. ही पात एकदम बारीक चिरुन घ्या.
यानंतर एका भांड्यात बेसन पीठ घ्यायचे आहे. त्यात हळद, मसाला, मिरची पावडर, ओवा टाकायचा आहे.
यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कांद्याची पात टाका. या मिश्रणात आजिबात पाणी टाकू नका.
यानंतर हे मिश्रण छान एकजीव करुन घ्या. हे मिश्रण जास्त सुकं वाटत असेल तर त्यात थेंबभर पाणी टाका.
यानंतर एका बाजूला तेल गरम करायला ठेवा.
तेल छान कडकडीत गरम झाले की त्यात या मिश्रणाचे भजी सोडा.
हे भजी छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्या. हे भजी तुम्ही पुदीना चटणी किंवा सॉससोबत खाऊ शकतात.