Siddhi Hande
सर्वांनाच चमचमीत,खमंग पदार्थ खायला आवडतात. त्यात कांदा भजी तर अनेकांचे आवडता पदार्थ असतो.
कांदा भजी करण्यासाठी सर्वप्रथम कांदा उभा पण बारीक कापावा.
हा कांदा तुम्ही पाण्यात भिजतदेखील ठेवू शकतात.
त्यानंतर एका मोठ्या भांड्यात बेसन पीठ घ्यावे. त्यात ओवा, बारीक चिरलेली मिरची, मिरची पावडर टाका.
यानंतर बेसन पीठ चांगले मिक्स करुन घ्या. त्यात चिरलेला कांदा टाका.
तुम्ही या मिश्रणात पाणीदेखील टाकू शकतात. परंतु पाणी टाकलं नाही तर भजी कुरकुरीत होतील.
पाण्याशिवाय पीठ आणि कांदा एकजीव करुन घ्यावा.
त्यानंतर तेल गरम करुन त्यात कांदा भजीचे सोडावे. मध्यम आचेवर भजी तळून घ्या.